WPL 2023:आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचे संघ आमनेसामने

रविवार, 5 मार्च 2023 (15:09 IST)
युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे संघ रविवारी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असतील. अ‍ॅलिसा हिली उत्तर प्रदेशचे तर बेथ मुनी गुजरातचे नेतृत्व करणार आहेत. दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. या सामन्यात यूपीचा संघ विजयाचा दावेदार म्हणून दिसत आहे. यूपीकडे परदेशी खेळाडूंमध्ये हीलीसह सोफी एक्लेस्टोन, ताहिला मॅकग्रा, ग्रेस हॅरिससारखे चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे दीप्ती शर्मा देखील आहे जी सामन्याचे चित्र बदलू शकते. दुसरीकडे, गुजरातचा संघ सोफिया, अॅशले गार्डनर तर स्नेह राणा, हरलीन डूलवर अवलंबून राहू शकतो.

 शनिवारी गुजरातला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 143 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात संघाने अनेक चुका केल्या. क्षेत्ररक्षणात संघाची कामगिरी खराब होती. तसेच अनेक झेल सोडले आणि फील्डिंग चुकले. अशा स्थितीत रविवारी संघाला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. मुंबईविरुद्ध कर्णधार बेथ मुनी रिटायर्ड हर्ट. अशा परिस्थितीत ती खेळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ती खेळली नाही तर गुजरातसाठी मोठा धक्का असू शकतो. अशा स्थितीत स्नेह राणाकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. सामना  संध्याकाळी 7:30 वा सुरु होणार.
 
यूपी वॉरियर्स: एलिसा हिली (विकेटकीपर), किरण नवगिरे, देविका वैद्य, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहिला मॅकग्रा/शबनम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस/एल बेल, पार्श्वी चोप्रा, अंजली सरवानी.
 
गुजरात जायंट्स: किम गर्थ/बेथ मुनी (wk/c), दयालन हेमलता, ऍशले गार्डनर, हरलीन देओल, सोफिया डंकले/अ‍ॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा, स्नेह राणा, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, मोनिका पटेल, तनुजा कंवर.
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती