गौतम गंभीरच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या विरोधात दिल्लीच्या न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट काढला आहे.  एका गृहनिर्माण प्रकल्पात गंभीरवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.  
 
गाझीयाबादमधील इंद्रपुरम भागात २०११ मध्ये रुद्रा बिल्टवेल या रिअल इस्टेट कंपनीचा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार गौतम गंभीर हा या प्रोजेक्टरचा डारेक्टर आणि ब्रँड अम्बेसिटर होता. हा प्रकल्प सुरुच झाला नाही.  पण, या प्रकल्पात कोटीची गुंतवणूक करुन फ्लॅट बूक केलेल्या एका ग्राहकाने या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. २०१६ ला या प्रकरणी केस दाखल झाली होती. या केसच्या सुनावणीला गौतम गंभीर सतत गैरहजर रहात असल्याने दिल्ली न्यायालयाने त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती