ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची झाली.  १७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.
 
 दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनं पुन्हा एकदा भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेतली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती