वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांची हैराण काढणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. ब्रावो  14 वर्षे वेस्ट इंडीजच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डासोबत वाद झाला आणि  त्याने निवृत्ती स्वीकाली आहे. 

ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये तो खेळत राहणार आहे. 17 ऑक्टोबर 2014 साली एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने प्रवेश केला होता. ब्रावोने जबरदस्त अश्या  अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. 14 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये त्याने 40 कसोटी, 164 एकदिवसीय सामने, 66 टी-20 सामने वेस्ट इंडीजसाठी खेळले आहेत. आयपीएलमध्ये ब्रावो हा धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती