विनोद कांबळी पुन्हा वादात! पत्नीने पोलिसांकडे केली मारहाणीची तक्रार

सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (07:46 IST)
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यप्राशन करून विनोद कांबळीकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
वांद्रे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विनोद कांबळीविरोधात भारतीय दंडविधानातील कलम ३२४, ५०४ या अंतर्गत गुन्हा दाखल केला. विनोद कांबळीने कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. यावेळी अँड्रियाच्या डोक्याला जखम झाली. दारुच्या नशेत कांबळीने हे कृत्य केल्याचा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण मिटल्याचेही कांबळीच्या पत्नीने सांगितले. पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी त्यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र रागाच्या भरात कांबळीने त्याच्या पत्नीच्या अंगावर कुकिंग पॅन फेकून मारला. यानंतर आता विनोद कांबळीसमोरील अडचणींमध्ये वाढ होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती