SRH vs DC : आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर
सोमवार, 5 मे 2025 (14:51 IST)
आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना 5 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल
दिल्लीविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांना कसून गोलंदाजी करावी लागेल.
गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला गुजरात टायटन्सविरुद्ध 38 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सलामीवीर अभिषेक शर्माने 41 चेंडूत 74 धावांची खेळी केली, पण तो संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकला नाही. संघाने आतापर्यंत 10 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे. येथून पुढे, प्रत्येक सामना त्यांच्यासाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती आहे.