सौरव गांगुली वादाच्या भोवऱ्यात, बोर्डाच्या संविधानाविरुद्ध जात असल्याचा आरोप

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (20:31 IST)
टीम इंडियाचे  माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे  विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी त्यांच्यावर मंडळाच्या संविधानाच्या विरोधात जात असल्याचा आरोप केला आहे.
 
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निवड समितीच्या बैठकीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर मंडळाचे अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत.
 
सोशल मीडियावरही चाहते गांगुलीच्या या कृतीला  चुकीचे सांगत आहेत. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. बोर्ड सध्या आयपीएलच्या मेगा लिलावाची तयारी करत आहे.
 
 बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही पूर्णपणे फसवी आणि खोटी बातमी आहे. तर आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'त्यांनी अनेक प्रसंगी असे केले आहे. आजकाल बीसीसीआय असेच चालू आहे. गांगुलीने निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याआधी गांगुलीने सांगितले होते की, मी कोहलीला T20 चे कर्णधारपद सोडू नका असे सांगितले होते. मात्र कोहलीने अशा बातमीला नाकारले होते.बोर्डाच्या नियमानुसार बीसीसीआयचे सचिव बैठकीला उपस्थित राहू शकतात. पण संघ निवडीची संपूर्ण जबाबदारी निवडकर्त्यांवर असते.
सौरव गांगुलीचे हे पाऊल चुकीचे असल्याचे सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत. असे काम कधीही होऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती