भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. 36 वर्षांचा असलेल्या रोहितने निवृत्तीपूर्वी आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली आहे. सध्या तो अमेरिकेत पोहोचला आहे. अमेरिकेत क्रिकेट झपाट्याने वाढत आहे. तेथे नुकतेच मेजर लीग क्रिकेटचेही आयोजन करण्यात आले होते. आता रोहित शर्माने कॅलिफोर्नियामध्ये आपली क्रिकेट अकॅडमी सुरू केली आहे
सिंगापूरचा रुप क्रिकेटर चेतन सूर्यवंशी हा रोहित शर्माचा बिझनेस पार्टनर आहे. त्याने रोहित शर्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अमेरिकेचे कर्णधार सौरभ नेत्रावळकरही होते. रोहित शर्माच्या अकॅडमीचे नाव क्रिककिंगडम क्रिकेट अकॅडमी आहे. पुढील वर्षी अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचे यजमानपद आहे. रोहितने लॉन्च प्रसंगी सांगितले की, मी येथे पुन्हा येण्यासाठी खूप उत्सुक आहे.
रोहित शर्माची ही पहिली क्रिकेट अकॅडमी नाही.तर रोहितची अकॅडमी भारता व्यतिरिक्त जपान आणि सिंगापूरमध्येही आहे. हे सर्व देश क्रिकेटसाठी नवीन आहेत आणि त्याचा सराव तिथे कमी आहे. या साठी रोहित ने आपली क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा विचार केला आणि क्रिकेट अकॅडमी सुरु केली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि मुंबईतील रोहित शर्माचा सहकारी धवल कुलकर्णी मेंटॉरच्या भूमिकेत आहे. प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक डेव्ह व्हिटमोर हे देखील अकॅडमीशी संबंधित आहेत.
भारतीय संघाला या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याआधी रोहित शर्मा विश्रांती घेत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्येही रोहित प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. आशिया चषकानंतर भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली 2023च्या विश्वचषकात प्रवेश करेल. या संघाने शेवटचे विश्वचषक 2011 मध्ये जिंकले होते.