भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक दौऱ्यानंतर खेळाडू तंदुरुस्त असल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी रविवारी सांगितले की, 'जडेजा आज सरावासाठी आला आहे. तो पुढचा सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माने जम्मू-काश्मीरविरुद्ध मुंबईच्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली. ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे देखील आपापल्या संघाच्या वतीने रणजी सामन्यात खेळतील.