राहुल द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (18:54 IST)
भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर टीम इंडिया सोडून ते शुक्रवारी सकाळी कोलकाताहुन एकटेच बंगळुरूसाठी  रवाना झाले. तर, इतर सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंसह भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी नंतर तिरुअनंतपुरमला रवाना होतील. तब्येतीच्या कारणास्तव द्रविडने कोलकाताहून बंगळुरूला पहाटे फ्लाइट घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान द्रविडयांनी रक्तदाबाची तक्रार केली होती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. मात्र, आता त्यांची चाचणी बेंगळुरूमध्येच होणार आहे.
 
मीडिया रिपोर्ट्स असेही सूचित करतात की द्रविडच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण ते पूर्णपणे बरे आहे आणि रविवारच्या सामन्यापूर्वी शनिवारी तिरुवनंतपुरममध्ये संघात सामील होऊ शकतात. बंगळुरूला जाणार्‍या फ्लाइटमध्ये द्रविड फिट दिसत असल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. भारताचे मुख्य प्रशिक्षक 11 जानेवारी रोजी 50 वर्षांचे झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आणि काही खबरदारीच्या चाचण्या घेण्यासाठी बेंगळुरूला गेले असल्याचे समजले आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती