ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे मन जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कोणतीही कसर सोडली नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्टेडियममध्ये पोहोचताच पंतप्रधान मोदींनी त्यांचे मिठी मारून स्वागत केले. यानंतर येथे रंगतदार सादरीकरण झाले. मोदी आणि अल्बानीज यांनी सोन्याचा मुलामा असलेल्या गोल्फ कारमधून स्टेडियमचा फेरफटका मारला आणि सामन्याचा नाणेफेकही केला.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनावेळी 1,10,000 क्षमतेच्या स्टेडियमला भेट दिली होती, परंतु नामांतरानंतर ते येथे कसोटी सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल.
यावेळी 1 लाखाहून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. हा भारतातील एक विक्रम असेल. याआधी, ईडन गार्डन्सवर ख्रिसमस कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक प्रेक्षक (88,000 ते 90,000) उपस्थित होते. नंतर त्याची प्रेक्षक क्षमता 67000 पर्यंत कमी करण्यात आली.
Edited by : Smita Joshi