आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची पात्रता फेरी रविवार, 18 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या दोन स्थानांवर जाण्यासाठी 10 संघ खेळतील. यजमान झिम्बाब्वेसह वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, यूएई आणि यूएसए यांच्यासह 10 संघ 34 एकदिवसीय सामने खेळणार आहेत. अव्वल दोन संघ भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरतील.
10 संघाला पाच पाचच्या गटात विभागले आहे. राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांशी खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्समध्ये पोहोचतील जेथे ते दुसऱ्या गटातील संघांशी खेळतील. येथे अव्वल दोन संघ भारतातील विश्वचषकासाठी पात्र ठरतील आणि ट्रॉफीसाठी अंतिम सामनाही खेळतील, परंतु अंतिम सामन्याच्या निकालाचा संघाच्या पात्रतेवर परिणाम होणार नाही.
कोण कोणत्या गटात
गट अ:नेपाळ, नेदरलँड, यूएसए, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे