ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा तिसर्या स्थानी कायम आहे. तर युवा ऋषभ पंत आपल्या कारकिर्दीतील आतार्पंतच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच 17 व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये कगिसो रबाडा आतार्पंतही क्रमवारीत अव्वल आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 711 गुणांसह 15 व्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडला आपले तिसरे स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडीजविरूध्द बुधवारपासून सुरू होणार्या तीन सामन्यांची मालिका जिंकावी लागेल. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे देखील त्यानंतर एक दिवसाने सुरू होणार्या दोन सामन्यांच्या मालिकेत महत्त्वपूर्ण गुण मिळविण्यासाठी तत्पर असतील. इंग्लंड जर 3-0 ने जिंकू शकला तर त्यांचे 109 गुण होतील. मात्र, तरीही त्यांचे स्थान भारत आणि दक्षिण आफ्रिका याच्यानंतरच असेल.