IND W vs WI W:भारतीय महिला संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. गुरुवारी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 4 गडी गमावून 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 157 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना जिंकला. आता 22 डिसेंबरपासून उभय संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि संघाला नऊ विकेट्सवर केवळ 157 धावा करता आल्या . चिनेल हेन्रीने 16 चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांसह 43 धावा केल्या तर डिआंड्रा डॉटिन (25) आणि कर्णधार हेली मॅथ्यूज (22) यांनीही उपयुक्त खेळी खेळली. मात्र, ती संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारताकडून फिरकीपटू राधा यादवने 29 धावांत चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय रेणुका सिंग, सजीवन सजना, तीतस साधू आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. स्मृती मंधानाचे सलग तिसरे अर्धशतक आणि ऋचा घोषच्या T20 मधील सर्वात वेगवान अर्धशतकामुळे भारताने T20 मध्ये आपली सर्वात मोठी धावसंख्या बनवली आहे