Ind vs Zim : भारताने ZIM चा 71 धावांनी पराभव केला, इंग्लंडसोबत उपांत्य फेरीत सामोरे जावे लागेल

रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (17:04 IST)
भारताच्या झिम्बाब्वेवरील दणदणीत विजयासह सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. सेमी फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे तर अन्य लढतीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. 9 नोव्हेंबरला ही लढत होईल तर 10 नोव्हेंबरला गुरुवारी भारत-इंग्लंड मुकाबला रंगेल.
 
रविवारच्या नाट्यमय लढतींचा शेवट भारताच्या झिम्बाब्वेवरील दणदणीत विजयाने झाला. सकाळच्या सत्रात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. के.एल राहुलने 35 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्ससह 51 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठी खेळी करू शकले नाहीत पण संपूर्ण स्पर्धेत भन्नाट फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने 25 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह 61 रन्सची वादळी खेळी केली. सूर्यकुमारने झिम्बाब्वेच्या प्रत्येक बॉलरचा समाचार घेत चाहत्यांना पर्वणी दिली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेचा डाव 115 रन्समध्येच आटोपला. रायन बर्लने 35 तर सिकंदर रझाने 34 रन्सची खेळी केली. 7 बॅट्समनना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारतातर्फे रवीचंद्रन अश्विनने 3 तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह भारताने गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थान राखले. भारताने पाकिस्तान, नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि बांगलादेशला नमवलं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

अश्विनने 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रायन बर्लला बॉलिंग करून भारताला सहावे यश मिळवून दिले.बुरले 22 चेंडूत 35 धावा काढून बाद झाला.
 
शेवटच्या दोन षटकांमध्ये अश्विन आणि अक्षर यांनी झिम्बाब्वेच्या दिशेने काही गती वळवण्यासाठी 28 धावा खर्च केल्या आहेत.येथे टीम इंडिया सहाव्या विकेटच्या शोधात आहे.
 
सिकंदर रझा आणि रायन बुर्ले यांनी झिम्बाब्वेचा डाव सांभाळला, झिम्बाब्वे 10 षटकांनंतर 59/5.शेवटच्या 10 षटकात संघाला 128 धावांची गरज आहे.
 
8व्या षटकात आलेल्या मोहम्मद शमीने यावेळी मुन्योंगाला विकेटसमोर झेलबाद केले.मुन्योंगा 5 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.शमीला दुसरी विकेट मिळाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती