भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. पुढील महिन्यापासून दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघांचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार असून स्मृती मंधाना उपकर्णधार असेल
भारतीय महिला संघ पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे आणि तेथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका28 जूनपासून सुरू होईल तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 16 जुलैपासून खेळवली जाईल. बीसीसीआयने वरिष्ठ महिला संघाची घोषणा केली. 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात शेफाली वर्माचे पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षीपासून ती भारतासाठी एकही सामना खेळलेली नाही. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील यांना कोणत्याही संघाचा भाग बनवण्यात आलेले नाही. अलिकडेच आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सायली सातघरेचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. त्रिकोणी मालिकेत दिसलेली काशवी गौतम या दौऱ्यावर जाणार नाही. त्यांच्या जागी क्रांती गौर यांना संधी मिळाली आहे.