इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले. पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या गिलने दुसऱ्या डावात 129 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. गिल या मालिकेत उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने दुसऱ्या डावातही आपली ताकद दाखवली आहे. गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताला मजबूत आघाडी मिळाली.
भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या शानदार शतकाच्या मदतीने, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने दुसऱ्या डावात चार गडी बाद 304 धावा केल्या. अशाप्रकारे भारताची आघाडी 484 धावांपर्यंत वाढली. गिल आणि जडेजा यांच्यात 100+ धावांची भागीदारी झाली जी शोएब बशीरने गिलला बाद करून मोडली. गिल 162 चेंडूत 13 चौकार आणि आठ षटकारांसह 161धावा करून बाद झाला.
या शतकासह गिलने मोठी कामगिरी केली आहे. सुनील गावस्कर नंतर गिल हा भारताचा दुसरा फलंदाज आहे आणि एकाच कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून शतक करणारा एकूण नववा फलंदाज आहे. गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात शतक झळकावले होते तर दुसऱ्या डावात द्विशतक झळकावण्यात ते यशस्वी झाले होते. अशाप्रकारे, गिल 54 वर्षांनंतर कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारा भारताचा दुसरा फलंदाज बनला आहे.
गिल कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी सामन्यात तीन शतके झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी कोहलीने ही कामगिरी केली आहे.एवढेच नाही तर, एका कसोटी मालिकेत तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारा गिल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.