भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ICC महिला विश्वचषक 2022 साठी संघाची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि शिखा पांडे यांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरला प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. यानंतर चाहत्यांनी निवडकर्त्यांवर चांगलाच राग काढला. जेमिमा विदेशी खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करते आणि तिला विश्वचषकाच्या संघात न घेणे हा चुकीचा निर्णय असल्याचे चाहत्यांचे मत आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 6 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडिया 11 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महिला विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना , शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (wk), स्नेह राणा, झुलन गोस्वामी , पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, तानिया भाटिया (wk), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.