सीएसकेने आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या मोहिमेचा शेवट विजयी पद्धतीने केला. पराभवानंतरही, गुजरात14 सामन्यांतून 18 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, तर सीएसकेने14 सामन्यांत चौथा विजय नोंदवला आणि आठ गुणांसह दहाव्या स्थानावर आपली मोहीम संपवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले. ब्रेव्हिसने फक्त 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात सीएसकेसाठी कॉनवे आणि ब्रेव्हिस यांनी अर्धशतके झळकावली. शेवटी ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली ज्यामुळे सीएसके 200 धावांचा टप्पा ओलांडू शकले.
सीएसकेकडून, जडेजा 18 चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावा काढून नाबाद परतला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर आर साई किशोर, रशीद खान आणि शाहरुख खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.