भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 2026 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी याची घोषणा केली. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांच्या फरकाने पराभव केला होता. लॉर्ड्सने याआधी महिलांचे सामने आयोजित केले आहेत, परंतु ते सर्व मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आहेत. "भारतीय महिला संघ 2026 मध्ये लॉर्ड्सवर एकमात्र कसोटी सामना खेळेल याची पुष्टी झाली आहे," असे ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे. या मैदानावर होणारा हा पहिलाच महिला कसोटी सामना असेल. गेल्या तीन वर्षांपासून, इंग्लंडचा महिला संघ लॉर्ड्सवर मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे, परंतु आता प्रथमच या मैदानावर महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे.
पुढील वर्षी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ 2026 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या कालावधीत, भारतीय संघ नॉटिंगहॅममध्ये 28 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, त्यातील अंतिम सामना 12 जुलै रोजी खेळवला जाईल. यानंतर 16 ते 22 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.