ग्वाल्हेर येथे 2010 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय लढतीत सचिनने मर्यादित षटकांमधील पहिलेवहिले ऐतिहासिक द्विशतक साजरे केले होते. मात्र सचिनच्या द्विशतकासाठी दहा धावा कमी असताना स्टेनने त्याचा गोलंदाजीवर मैदानातील पंच गोल्ड यांच्याकडे पायचीत करता अपिल केले होते. मात्र पंचांनी ते फेटाळले. त्यानंतर अर्थातच सचिनने द्विशतक साजरे केले होते. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेवहिले द्विशतक सचिनने आमच्याविरुद्ध ग्वाल्हेर येथे साजरे केले. मात्र तला मी 190 धावांच्या आसपास असताना पायचीतद्वारे बाद ठरवण्यासाठी पंचांकडे दाद मागितली होती. इयान गोल्ड तेव्हा पंच होते. मात्र त्यांनी सचिनला नाबाद ठरवले. मी तेव्हा पंचांना तुम्ही त्याला नाबाद कसे ठरवता असे विचारत होतो. मात्र त्यांच्या चेहरवरील हावभाव पाहून त्यांना असेच म्हणाचे होते की जर त्यांनी सचिनला बाद दिले तर त्यांना हॉटेलात भारतीय प्रेक्षक पोहोचू देणार नाहीत, अशाप्रकारे आठवण स्टेनने सांगितली.