विनी रमनने तिच्या बेबी शॉवर सोहळ्यात निळ्या रंगाची पारंपारिक साडी घातली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. एका फोटोत ती पती ग्लेन मॅक्सवेलसोबत दिसत आहे. मॅक्सवेल काळ्या शर्टमध्ये दिसला. पोस्ट शेअर करताना विनीने कॅप्शनमध्ये लिहिले,
ग्लेन मॅक्सवेल आता 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून संघात परतेल अशी अपेक्षा आहे. या दौऱ्यात कांगारू संघ प्रोटीज संघासोबत तीन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी विश्वचषक पाहता ऑस्ट्रेलियाचा हा दौरा खूप महत्त्वाचा ठरणार असून त्यात मॅक्सवेलला नक्कीच चांगली कामगिरी करायची आहे.