डेहरादून- भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. नववर्षात विराट आणि अनुष्का साखरपुडा करतील, असे म्हटले जात आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी विराट आणि अनुष्का सध्या उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत.
ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले आहेत, तिथे नातेवाईकांचा राबता वाढत आहे. एका वृत्तपत्रानुसार, या दोघांच्या साखरपुड्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावतही 1 जानेवारीला येथे पोहचणार आहे. मात्र साखरपुड्याबाबत अनुष्का आणि विराटकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाले नाही.