रणजी ट्रॉफी 2024-25 च्या दुसऱ्या सत्राला गुरुवारी सुरुवात झाली. क गटाचा सामना बंगाल आणि हरियाणा यांच्यात होत आहे. या सामन्यात अंकित चॅटर्जीने बंगालकडून पदार्पण केले. यासह त्याने मोठी कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला.
अंकितने गांगुलीचा विक्रम मोडला. त्याच्या आधी हा विक्रम माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुलीच्या नावावर होता. 1989-90 मध्ये त्याने वयाच्या 17 व्या वर्षी बंगालसाठी पहिला सामना खेळला. हा सामना रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना होता ज्यात बंगालने दिल्लीचा पराभव केला होता.