विराट कोहलीचा नुकताच 22 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याच्या दुखापतीच्या वृत्तानंतर त्याच्या खेळण्यावर साशंकता निर्माण झाली आहे. कोहलीने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीदरम्यान त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
कोहलीने शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता. एका वर्षानंतर सचिन तेंडुलकरने लाहलीत हरियाणाविरुद्ध शेवटचा रणजी सामना खेळला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सात वर्षांनंतर रणजी सामना खेळणार असला तरी त्याने कर्णधारपद नाकारल्याचे समजते. दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी राहील. सध्याच्या कर्णधाराने कमान सांभाळायला हवी, असे ऋषभचे मत आहे.