सानंद ट्रस्टच्या पाच प्रेक्षक गटांसाठी 'सुर्याची पिल्ले' हे माइलस्टोन नाटक ११-१२-१३ जुलै २०२५ रोजी स्थानिक देवी अहिल्या विश्वविद्यालय सभागृह, खांडवा रोड, इंदूर येथे सादर केले जाईल.
सानंद ट्रस्टचे अध्यक्ष जयंत भिसे आणि मानद सचिव संजीव वावीकर म्हणाले की, मराठी रंगभूमीचे सुवर्णकाळ समृद्ध करणाऱ्या प्रमुख लेखकांमध्ये वसंत कानेटकर यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्रात साजरे केले जात आहे. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी हिमालयाची सावली, वेड्याचं घर उन्हात, विषवृक्षाची छाया, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, प्रेमाच्या गावा जावे, गगनभेदी, तू तर चाफेकळी, मत्स्यगंधा, कस्तुरीमृग, मीरा मधुरा, या सह सुर्याची पिल्ले ही नाटके प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, स्नेहा माजगांवकर, सुहास परांजपे, उमेश जगताप, शर्वरी पाटणकर आणि सुनील बर्वे हे कलाकार आहेत.
लेखक- वसंत कानेटकर, दिग्दर्शिका प्रतिभा कुलकर्णी, नेपथ्य, प्रकाशयोजना- प्रदीप मुळ्ये, संगीत- अशोक पत्की, सेट डिझाइन- किरण शिंदे, वेशभूषा मंगल केंकरे, सूत्रधर दीपक जोशी. निर्माते- सुनील बर्वे, नितीन भालचंद्र नाईक.
'सुर्याची पिल्ले' हे नाटक ११ जुलै २०२५ रोजी शुक्रवारी मामा मुजुमदार समूहासाठी संध्याकाळी ६.३० वाजता, १२ जुलै २०२५ रोजी शनिवारी रामुभैय्या दाते समूहासाठी दुपारी ३.३० वाजता, राहुल बारपुते समूहासाठी संध्याकाळी ७.३० वाजता तसेच रविवार, १३ जुलै २०२५ रोजी वसंत गटासाठी दुपारी ३.३० वाजता आणि बहार गटासाठी संध्याकाळी ७.३० वाजता असेल.