Siddharth Chandekar: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आईचं दुसरं लग्न लावलं

बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (11:30 IST)
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या आईचे दुसरे लग्न लावले आहे. सिद्धार्थने त्याची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न स्वतः पुढाकार घेत लावले असून त्याने आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात आईसाठी त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, 
 
"Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्तापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married life
 
सिद्धार्थच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी सिद्धार्थचा पाठिंबा होता. सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरने देखील आपल्या सासूसाठी पोस्ट शेअर करून त्यांना शुभेच्छा सासूबाई असे कॅप्शन देत पोस्ट केली आहे.  सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनी सिद्धार्थचे कौतुक  केले आहे. कलाकारांनी सिद्धार्थच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती