मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील वजीराबाद गावात एल्विश यादव यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे 24 राउंड गोळीबार केला. गोळीबार सुरू होताच, एल्विश यादव यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करणारा व्यक्ती घाबरून आत पळून गेला. त्याने एल्विश यादव यांचे वडील मास्टर राम अवतार यांनाही माहिती दिली.
मास्टर राम अवतार यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. गोळीबाराच्या वेळी एल्विश यादव घरी नव्हते. तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, एक हल्लेखोर थोड्या अंतरावर दुचाकीवरून उतरला आणि दोन मुलांनी एकामागोमाग गोळ्या झाडल्या.