सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतेच त्यांनी 'चला हवा येऊ द्या' मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. अभिषेकने प्रमोशन दरम्यान अनेक कार्यक्रमांना आणि टिव्ही शोला भेटी दिल्या आहेत. अभिषेक या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय टिव्ही शो 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्याने हजेरी लावली आहे. या शो आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आल्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अभिषेकने प्रमोशनमध्ये स्पेशल झणझणीत मिसळवर ताव मारला होता. सध्या अभिषेकच्या एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिषेकने प्रमोशन दरम्यान, त्याला मामलेदारची मिसळ फार आवडते, असे सांगितले होते. त्याला मिसळ खूपच आवडत असून तो नेहमीच मिसळ खातो. सोबतच यावेळी अभिषेकने मिसळवर ताव मारल्यानंतर सैराटच्या झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही करताना दिसला.