मांजरेकर म्हणाले, सलमान हा खूपच सहृदयी माणूस आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. यावर सलमान म्हणाला, महेश हा फक्त चांगला दिग्दर्शकच नाही तर तो उत्तम लेखकदेखील आहे. याचा प्रत्यय आपल्याला परफॉर्मन्समध्ये दिसतो.
यावेळी सलमानने एक गौप्यस्फोट केला. तो म्हणाला, तुम्ही मला महेशच्या 'एफयू' या चित्रपटात गाणे गाताना ऐकणार आहात. एफयू चा फूल फॉर्म 'फन अनलिमिटेड' असा आहे. सलमान खानला मराठी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. तो लय भारी या चित्रपटात रितेश देशमुखसोबत एका सीनमध्ये दिसला होता.