Rinku Rajguru in Jyotiba Temple Kolhapur सैराट या मराठी चित्रपटात आर्चीची भूमिका साकारुन कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकु राजगुरु सर्वांची लाडकी असून आघाडीची अभिनेत्री आहे. रिंकू नुकतीच दख्खनचा राजा ज्योतिबाला गेली असून तिनं इथला देवदर्शनाचा व्हिडिओ शेयर केला आहे. चागंभलं असं कॅप्शन तिनं आपल्या पोस्टला दिलं आहे.
रिंकूनं कोल्हापूर येथे ज्योतिबाचं दर्शन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकूनं हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई, आजी देखील दिसत आहे. कुटुंबासोबत रिंकूने मंदिरा कुळाचार आणि इतर विधी पार पाडले. यावेळी मंदिर प्रशासनाकडून रिंकूचे जोरदार स्वागत आणि आदर सत्कार करण्यात आले.