रात्रीस खेळ चाले फेम ही अभिनेत्री अडकली विवाह बंधनात

Webdunia
शनिवार, 17 डिसेंबर 2022 (10:35 IST)
सध्या सिनेश्रुष्टीत लग्नाचा हंगाम आहे. अक्षय-हार्दिक , आशय- सानिका ,सुमित पुसावळे आणि हरीश दुधाडे नंतर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजे अभिनेत्री कृतिका तुळसकर ही वैवाहिक बंधनात अडकली. हिने मराठी चित्रपटातील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांच्या सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांच्या लहानसमारंभात सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली.

Photo- Instagram
दिग्दर्शक विशाल देवरुखकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांनी बॉईज ,बॉईज 2 आणि बॉईज 3 ,गर्ल्स या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेत्री कृतिका ही गेल्या 18 वर्षांपासून रंगभूमीवर काम करते. ती कत्थक विशारद असून मानसोपचारतज्ज्ञ देखील आहे. कृतिकाने झी मराठीची लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले मध्ये शेवंताची भूमिका साकारली होती. 

Edited By- Priya Dixit

संबंधित माहिती

पुढील लेख