'महाभारत'च्या 'कृष्ण' नितीश भारद्वाज यांचा घटस्फोट झाला

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:03 IST)
बीआर चोप्रा यांच्या ऐतिहासिक शो 'महाभारत'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 12 वर्षानंतर पत्नी स्मिता गाते चंद्रासोबत विभक्त झाले आहे. लग्न मोडल्यानंतर आता या अभिनेत्याने 'घटस्फोट'बाबतचा अनुभव सांगितला आहे. आपल्या वक्तव्यात त्यांनी 'घटस्फोट'ला सर्वात वेदनादायक म्हटले आहे. यासोबतच विवाह तुटण्याची पुढील कारणे सांगून घटस्फोटाचा सर्वाधिक त्रास मुलांना होतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एवढ्या मोठ्या निर्णयात मुलांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घ्यावे .
 
 नितीश भारद्वाज यांनी दोन विवाह केले होते, परंतु दोन्ही अयशस्वी ठरले. या दोन लग्नांमध्ये नितीश भारद्वाज हे 4 मुलांचे वडील आहेत. नितीश यांचे पहिले लग्न 27 डिसेंबर1991 रोजी मोनिषा पाटील यांच्याशी झाले होते. मात्र, 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. 2008 मध्ये, मोनिषाशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांनी, नितीशने त्यांची  मैत्रिण स्मिता गाते  हिच्याशी दुसरे लग्न केले आणि 12 वर्षानंतर 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. स्मिता या मध्य प्रदेश कॅडरच्या 1992 च्या बॅचच्या IAS अधिकारी  आहे. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत.
नितीश यांनी  आपल्या आयुष्यातील दोन्ही लग्न मोडल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या ते हणाले मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आम्ही वेगळे का झालो याच्या कारणांमध्ये मला पडायचे नाही. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. मी एवढेच सांगू शकतो की ते, काहीवेळा घटस्फोट मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक असू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती