मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (13:54 IST)
Instagram
जुई गडकरी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सध्या ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारतेय. सध्या ही मालिका टीआरपीच्या शिखरावर आहे. 
 
अशातच ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी खर्‍या आयुष्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. जुईने स्वत:च्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. पुढील 4 फेब्रुवारीला ती लग्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे. पण तिने अद्याप होणार्‍या नवर्‍याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही आहे. त्यामुळे चाहत्यांना तिचा नवरा कोण याची उत्सुकता लागली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती