रेशमने (Resham Tipnis) पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. रेशम हि तिच्या आईच्या खूपच जवळ होती. आईच्या जाण्याने सध्या ती कोलमडली आहे. आईचा फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “आई……. यापुढे तुझा फोन येणार नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. तुझ्यामुळे मी आज एवढी खंबीर बनले. मी तुला वचन देते की मी आयुष्यभर अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम मला तुझी खुप खुप आठवण येत आहे”.
Edited by : Smita Joshi