Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप

Webdunia
रविवार, 21 मे 2023 (15:56 IST)
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सिझन सुरू होत आहे. येत्या 29 मे पासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. असे संकेत स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी दिले आहेत. प्रियदर्शनी इंदलकर ने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत पोस्ट केलं आहे. आता भेटू 2 महिन्यांनी असं पोस्ट केलं आहे.
 
सध्या या हास्यजत्रेतील कलाकार शेवटच्या भागांचं शूटिंग करत आहे. तर गौरव मोरे याने सर्वांसोबत सेल्फी काढत आनेवाला पल जानेवाला है असं गाणं लावलं आहे. शेवटचा दिवस शेवटचं शुंटिंग असं कॅप्शन देत हे सर्व कलाकार भावुक झाले आहे. 

कलाकार रसिक वेंगुर्लेकर यांनी आमचा शो बंद होत नाही तर आम्ही सुट्टीवर जात आहोत लवकरच पुन्हा भेटू असं त्यांनी चाहत्यांना म्हटलं आहे. येत्या 29 मे पासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
 
 

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख