शालूने जब्या सोबतचा केला फोटो शेअर

Webdunia
गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:37 IST)
मुंबई : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावलंय होते. आजही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. अभिनेत्री राजेश्वरी खरात आणि अभिनेता सोमनाथ अवघडे या दोघांनी या चित्रपटात शालू आणि जब्याची भूमिका साकारली होती, जब्या आणि शालूच्या अप्रतिम अभिनयाने फँड्री या चित्रपटाला पे्रक्षकांनी डोक्यावर घेतले होते. दरम्यान, अभिनेती राजश्रीने तीचा आणि सोमनाथचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे, यामुळे या दोघांचे चाहते पुन्हा फँन्ड्रीची आठवण काढत आहेत.
 
राजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोनंतर चाहते चांगलेच घायाळ झाले असून, दोघेजण ख-या अर्थाने प्रेमाच्या जाळ्यात अडकले की काय असा अंदाज लावत आहेत. तर अनेक चाहते या दोघांमध्ये नेमकं चालले तरी काय? असा प्रश्न विचारत आहेत. तर काही जण नवीन चित्रपटाची शुटिंग सुरू आहे का अशी विचारना करत आहेत, तर अनेकांनी फँन्ड्रीची आठवण काढत फँन्ड्री २ ला सुरूवात केली?
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

अशा कमेन्ट्स करत आहेत. दोघांच्या चाहत्यांनी फोटोखालील कमेंट बॉक्स फुल्ल केला आहे. वेगवेगळया विषयावर चित्रपट बनवून समाजाला आरसा दाखवण्याचे काम करणा-या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँन्ड्री हा पहिलाच चित्रपट होता.या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावर मजल मारली होती. नागराजचे दिग्दर्शन, सोमनाथ आणि राजश्रीचा उत्तम अभिनय आणि अजय अतुलच्या बहारदार संगीताने फँन्ड्रीने मराठी सिनेमाला मोठ्या उंचीवर नेहून ठेवले होते.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख