‘पावनखिंड’ने रचला विक्रम, चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (11:35 IST)
'पावनखिंड' चित्रपट 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे महाराष्ट्राच्या इतिहासावरील आणि मराठी सिनेसृष्टीवरील प्रेम स्पष्ट कळून येतं.
 
बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून या चित्रपटाला पहिल्याच दिवशी राज्यभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एकच दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकत आहेत.
 
या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका अभिनेते अजय पूरकर यांनी साकारली असून लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराजअष्टक’ सीरिजमधील हा तिसरा चित्रपट आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' हे दोन चित्रपटानंतर लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान उलगडलं आहे.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

पावनखिंडला मिळतअसलेला प्रतिसाद बघून प्राजक्ता माळीने एका खास पोस्ट शेअर करत याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ताने यात श्रीतम रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती