काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका, गायिका वैशाली भैसने ची फेसबुकवर पोस्ट

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया
गायिका वैशाली भैसने ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. वैशालीची एक पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वैशालीने तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. वैशालीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. “माझ्या हत्येचा कट रचला जातोय. २ दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”, अशी पोस्ट वैशालीने केली आहे. 
 
सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती