तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आता उशीर करू नका.नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार दिवाळीनंतर भारतात एंट्री लेव्हल सेगमेंटच्या स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात. ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत देशातील स्मार्टफोनच्या किमती 5-7 टक्क्यांनी वाढू शकतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण मागणीवर परिणाम करत आहे. त्यामुळे यंदा स्मार्टफोनची शिपमेंटही कमी होऊ शकते.
उद्योग अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या हंगामातील मागणी वाढवण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या घटकांच्या वाढीव किंमतीचा भार उचलत आहेत. आता त्यांना हा खर्च ग्राहकांना द्यायचा आहे. यासह, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत स्मार्टफोनची सरासरी किंमत 20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, जी एप्रिल-जूनमध्ये 17,000 रुपये होती. रुपयाच्या घसरणीचा निश्चितच खर्चावर परिणाम होणार असल्याचे मोबाईल फोन कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.