सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत गुकेशची संयुक्त सहाव्या स्थानावर घसरण

शनिवार, 16 ऑगस्ट 2025 (10:22 IST)

ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एका विजय आणि चार बरोबरीनंतर विश्वविजेता डी गुकेश संयुक्त सहाव्या स्थानावर घसरला.

ALSO READ: सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झच्या पहिल्या दिवसानंतर गुकेश कडून ओपरिन-लीमचा पराभव

गुकेशला दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी करावी लागेल कारण त्याला पुनरागमन करण्यासाठी फक्त नऊ ब्लिट्झ गेम शिल्लक आहेत. अमेरिकेचा लेव्हॉन आरोनियन एकूण 19 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर फॅबियानो कारुआना त्याच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहे.

ALSO READ: नागपूरची दिव्या हम्पीला हरवून बनली जागतिक बुद्धिबळ विजेती

तिसऱ्या स्थानावर फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह 16.5 गुणांसह आहे. उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह अमेरिकेचा वेस्ली सो यांच्यासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.

ALSO READ: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करणार

गुकेश आणि व्हिएतनामचा लिम ले क्वांग प्रत्येकी 13 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचा लिएनियर डोमिंग्वेझ त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहे

Edited By - Priya Dixit

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती