Tomato price hike: टोमॅटोच्या दरात वाढ, 1 किलोसाठी एवढे पैसे द्यावे लागणार

शुक्रवार, 23 जून 2023 (11:06 IST)
सध्या पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भाज्यांचे भाव वधारले आहे. सर्व भाज्यांमध्ये वापरला जाणारा टोमॅटोचे भाव देखील अवकाळी पावसामुळे आणि उष्णतेमुळे टोमॅटोचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे टोमॅटोचे दर वधारले आहे. साधारणपणे 20 रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता 60 रुपये किलोच्या भावाने मिळणार आहे. 
सॅलड पासून ग्रेव्हीच्या भाज्यांपर्यंत टोमॅटोचा वापर केला जातो. 

बाजारात मिळणारा 20 रुपये किलो टोमॅटो आता 60 रुपये किलोच्या दराने मिळणार आहे. यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडणार आहे. 

सध्या परराज्यातून भाज्या येत आहे. परराज्यातून होणाऱ्या टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले आहे. 

वाशीतील एमपीएमसी बाजारात टोमॅटोची मागणी जास्त असून आवक कमी असल्यामुळे भाव वधारले आहे असे  व्यापाऱ्यांनी सांगितले. 

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव 28 रुपयांपासून 40 रुपायांपर्यंत वाढले आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. बाजारात बंगळुरू वरून येणारी टोमॅटोची आवक बंद असल्यामुळे राज्यातून आणि परराज्यातून टोमॅटोची आवक सुरु आहे. टोमॅटोचे उत्पादन देखील यंदा कमी झाले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती