आनंदाची बातमी वीज बिलात मिळणार सबसिडी ग्राहकाच्या खात्यावर जमा होणार सबसिडी

मंगळवार, 9 जुलै 2019 (09:41 IST)
देशातील नागरिकांना व्यवस्थित वीज मिळावी यासाठी वीज मंत्रालयाने एक नवीन टेरिफ योजना आणली आहे. या योजनेला सर्व मंत्रालयाकडे मंजुरीसाठी देण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहिती नुसार नवीन टेरिफ योजनेत विजेवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये मोठे बदल होणार आहेत. या नवीन योजनेत थेट ग्राहकांच्या खात्यात या योजनेचे पैसे देण्याचा सरकारचा विचार करत आहेत.
 
प्रत्येक राज्यातील विभागांना त्यांच्या राज्यातील वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. एका वर्षाच्या आतमध्ये सर्व राज्यांना हि माहिती केंद्र सरकारला द्यायची आहे.  सोबतच  प्रत्येक घरात स्मार्ट मीटर त्याचबरोबर या नवीन योजनेत प्रत्येक घरी विजेचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. तर ग्राहकांना हप्त्यावर देखील हे स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे स्मार्ट मीटर प्रत्येक घरात बसवण्यात येथील. नवीन योजनेत वीज बिलांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. यामध्ये आता फक्त तुम्ही वापरलेल्या युनिटचे पैसे द्यायचे आहेत. यापूर्वी यामध्ये अनेक विविध कर तसेच वाहक चार्जेस लावण्यात यते असत. यामुळे आता नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढे बोझा पडणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती