एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले असून, सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी हे सागितले आहे. सुयोग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे अंग काढून घेणार आहे असे मत्त असून सरकार अनुकूल असल्याचं ते म्हणाले आहेत.