350 रुपयाचा शिक्का, जाणून घ्या विशेषता

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच 350 रुपये असा शिक्का जारी करणार आहे. आरबीआयने गुरु गोबिंद सिंहजी महाराज यांच्या 350 व्या प्रकाशोत्सवावर सामान्य जनतेसाठी बाजारात पेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खूप कमी काळावधीसाठी हा शिक्का जारी केला जाईल. आरबीआयकडून असे शिक्के विशेष प्रसंगी जारी केले जातात. आरबीआयकडून प्रस्तुत करण्यात येणारे 350 रुपयांच्या शिक्कयांमध्ये चांदी 50 टक्के, कॉपर 40 टक्के, निकल पाच टक्के आणि जिंकची मात्रा पाच टक्के असेल.
 
ही असणार विशेषता: 350 रुपयाचा हा शिक्का 44 एमएमचा असणार. चांदी, कॉपर, निकल आणि जिंक मिसळलेल्या या शिक्क्यात पुढील भागावर अशोक स्तंभ असून खाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. शिक्क्याच्या दोन्ही बाजूला इंग्रजीत इंडिया आणि देवनागरी लिपीमध्ये भारत लिहिलेलं असेल.
 
याच भागेवर रुपयाचे सिंबल आणि मध्ये 350 लिहिलेले असेल, तसेच शिक्क्याच्या मागील भागावर इंग्रजी आणि देवनागरीमध्ये श्री गुरु गोबिंद सिंहजी यांचा 350वा प्रकाश उत्सव असे लिहिलेलं असेल. यावर 1666-2016 असेही लिहिलेलं असेल. आरबीआयच्या नोटिफिकेशनप्रमाणे शिक्क्याच वजन 34.65 ते 35.35 ग्रामच्या आत असेल. किती संख्येत शिक्के जारी केले जातील याबद्दल माहिती पुरवण्यात आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती