यामध्ये कंपनीच्या अलिशान 520डी या कारचाही समावेश आहे. कंपनीने जरी या कार माघारी बोलावल्या असल्या तरीही यापैकी 20 हजार कारची अद्याप तपासणी व्हायची आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या कार रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी दक्षिण कोरियाचे वाहतूक मंत्री किम ह्युन-मी यांनी बीएमडब्ल्यू कार मालकांना या कार मोठी दुर्घटना घडण्याआधीच कंपनीकडे परत कराव्यात, असे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.