खबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (16:11 IST)
कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली आहे. खबरदारी म्हणून एटीएम बंद ठेवण्यात आली असली तरी बँकेच्या शाखांमधून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. खातेदारांना त्यांच्या व्यवहारात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच आरटीजीएसवरून व्यवहार सुरू आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.
 
बँकेतून काढण्यात आलेले सर्व पैसे हे एकाच दिवशी नाही तर दोन तीन दिवसात भारतासह २९ देशांतील विविध एटीएम सेंटरवरून काढण्यात आले आहेत. १२ हजारहून अधिक ट्रान्झॅक्शन विदेशात तर २८०० ट्रान्झॅक्शन हिंदुस्थानात झाले आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती