RBI चा सर्वसामान्यांना झटका

बुधवार, 7 डिसेंबर 2022 (10:52 IST)
RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा रेपो रेट वाढवला आहे. मध्यवर्ती बँकेने पॉलिसी व्याजदरात 0.35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. यासह रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी रेपो दर 5.90 टक्के होता. रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देते. या वाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.
 
चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या निर्णयाबद्दल माहिती देताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की MPC ने एकमताने रेपो दरात 0.35 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीनंतर रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. पूर्वी ते 5.90 वर होते.
 
रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक सोमवारी सुरू झाली.

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती