शेतकऱ्यांकडून एकाच खताची अधिकची मागणी होते. त्यामुळे कृत्रिम तुटवडा भासून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. आता तर मिश्र खताचा सुळसुळाट सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खते घेतात त्यांच्याबाबत असे प्रकार अधिक घडतात.
कंपन्यांकडून अप्रमाणित खताची विक्री
उत्पादन वाढीसाठी प्रमाणित बियाणे महत्वाचे आहे. असे असताना राज्यातील 6 खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री़ अनाधिकृत खताचा साठा अशा एन ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 6 कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत. करावाईच्या अनुशंगाने केंद्रातील सहसचिव नीरजा आदीदम यांनी राज्याला एका पत्राद्वारे ही करावाईचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी खत खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.