पेट्रोल पम्प यांचा अधोरेखित करणारा संप

सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (10:05 IST)
देशभरातील पेट्रोल पंपचालक लवकरच  संपावर जात आहेत. या संपात महराष्ट्रातातील अनेक  पंपचालकही सहभागी होणार आहे. या पंपचालकांनी मुख्य  तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये  डिलर्सना आश्वासित पद्धतीने कमिशन द्यावे, ट्रान्सपोर्टचा विचार करुन कमिशन द्यावे, इथेनॉल ब्लेंडींगची आवश्यक यंत्रणा उभी करावी अशा या तीन मागण्या आहेत. या तीन मागण्या मंजूर होत नसतील तर त्याचा फटका थेट ग्राहकांना बसतो असं पंपचालक यांनी सांगितलं. याचा निषेध सात ते सव्वासात या १५ मिनिटांच्या काळात पंपांचे कामकाज बंद ठेवले जाणार आहे.  तर पुढे तीन आणि चार नोव्हेंबरला हे पंपचालक कसलंही इंधन खरेदी करणार नाहीत,यामध्ये पाच ते पंधरा नोव्हेंबर  काळात एकाच शिफ्टमध्ये पंपावर इंधनाची विक्री चालू राहील, याची दखल घेतली न गेल्यास १५ नोव्हेंबरपासून पंप बेमुदत बंद ठेवले जातील असा निर्णय झाल्याची माहिती यांनी दिली. ग्राहकांना होणारी अडचण आम्ही समजून घेतो पण ती सरकारनेही समजून घ्यावी असं संघटनेने  म्हटले आहे. त्यामुळे दिपावालीत नागरिकांना मोठा फटका बासनारा आहे.
 

वेबदुनिया वर वाचा